2025, Vol. 7, Issue 2, Part A
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता: शैक्षणिक दर्जा, वय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास
Author(s): सय्यद वसीम सय्यद नियाजअली
Abstract: या संशोधनाचा उद्देश उत्तरदात्यांच्या शैक्षणिक स्तराचा त्यांच्या मानसिक आरोग्याविषयीच्या जागरूकतेवरील प्रभावाचा अभ्यास करणे, वय आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याच्या प्रवृत्तीतील संबंध तपासणे, तसेच मानसिक आरोग्यासंबंधित शासकीय योजना आणि कायद्यांची माहिती व शैक्षणिक दर्जा यामधील सहसंबंधाचा अभ्यास करणे हा आहे. या अभ्यासासाठी टारकपूर, अहमदनगर येथील 50 परिचारिकांची उद्देशपूर्ण नमुना पद्धतीने निवड करण्यात आली. माहिती संकलनासाठी प्राथमिक व द्वितीयक स्रोतांचा वापर करण्यात आला. सांख्यिकीय विश्लेषणात चि-स्क्वेअर आणि टी-टेस्ट तंत्रांचा उपयोग करण्यात आला. संशोधनानुसार, उच्च शैक्षणिक स्तर असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता अधिक असल्याचे आढळले. वयाच्या गटांनुसार मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यामध्ये फरक दिसून आला, जिथे तरुण वयोगटातील लोक अधिक जागरूक होते. तसेच, मानसिक आरोग्यासंबंधित शासकीय योजनांची माहिती आणि शैक्षणिक स्तर यामध्ये लक्षणीय सहसंबंध आढळला. या अभ्यासातून मानसिक आरोग्यासंबंधी प्रभावी जनजागृती आणि शासकीय योजनांचा प्रचार करण्याची गरज अधोरेखित होते.
DOI: 10.33545/27068919.2025.v7.i2a.1359Pages: 25-29 | Views: 47 | Downloads: 18Download Full Article: Click Here
How to cite this article:
सय्यद वसीम सय्यद नियाजअली.
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता: शैक्षणिक दर्जा, वय आणि सामाजिक घटकांचा अभ्यास. Int J Adv Acad Stud 2025;7(2):25-29. DOI:
10.33545/27068919.2025.v7.i2a.1359